मलेशियातील आगीत १०० जखमी   

क्वालालांपूर : मलेशियात वायूवाहिनीचा भीषण स्फोट झाला. त्यानंतर ४९ घरांना आग लागली. आगीचे लोळ आकाशाला भिडले. त्यात १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 
 
क्वालालांपूर शहरात पुत्रा येथे वायू साठवणूक केंद्र आहे. आग एवढी भीषण होती की, कित्येक किलोमीटरवरून ज्वाळा भडकत असल्यााचे दिसले. ईदच्या दिवशी नागरिक सण साजरा करण्यात मग्न असताना स्फोट झाला. दरम्यान, मुस्लिम धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला मलेशिया देश आहे. राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोन्सने सांगितले की, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वायू वाहिन्यांपैकी एका वाहिनीला आग लागली. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने कारवाई करुन परिसर निर्मनुष्य केला. आग पसरू नये, यासाठी व्हॉल्व तातडीने बंद केले. त्यामुळे आणखी नुकसान टळले, असा दावा केला. आगीचे लोळ आकाशात २० मजली इमारतीपेक्षा अधिक उंचीपर्यंत पोहोचल्या. ४९ घरे भस्मसात झाली. ११२ जण जखमी झाले. ६३ जणांवर उपचार सुरू आहेत. 

Related Articles